
Shivkalin Wagh Nakh
esakal
हायलाइट्स (Highlight Summary – 3 Points)
शिवकालीन वाघनखे कोल्हापुरात दाखल – ऐतिहासिक क्षण!
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी (लक्ष्मी विलास पॅलेस) शिवकालीन वाघनखे दाखल झाली आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन लवकरच
“शिवशस्त्र शौर्यगाथा” प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
सहा महिन्यांचे प्रदर्शन, पोलिस बंदोबस्त कडेकोट
लक्ष्मी विलास पॅलेस येथे सहा महिन्यांसाठी वाघनखांचे प्रदर्शन खुले राहणार आहे.
Wagh Nakh Arrives in Kolhapur : कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस) येथे दोन दिवसांपूर्वी खंडेनवमीदिवशी शिवकालीन वाघनखे दाखल झाल्याचे वृत्त आहे. त्यासोबत शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्यांची वेळ मिळाल्यानंतर लवकरच हे उद्घाटन होईल. त्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.