कट्टर शिवसैनिकांनाही आमिषे; शिंदे गटातील कोकणातील आमदारांसह एजंटांचे फोन

अशा एंजटांच्या हाती कोणी लागू नये हा सुद्धा बंदोबस्त आम्ही केला आहे.
shiv sena
shiv sena
Summary

अशा एंजटांच्या हाती कोणी लागू नये हा सुद्धा बंदोबस्त आम्ही केला आहे.

कोल्हापूर : शिंदे गटातील कोकणातील आमदार व त्यांचे काही एजंट जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना पदे, निधी आणि पैशाची आमिषे दाखवून खेचण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. शिंदे यांचे सरकार न्यायालयात टिकणार नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एजंटांपासून सावध राहण्याचे आवाहनही पवार यांनी केले.

shiv sena
NCP : सदाभाऊ म्हणतात, जागतिक गणित तज्ञ म्हणून यंदाच 'नोबेल' मिटकरींना; राष्ट्रवादीकडून नाव जाहीर

यावेळी जिल्‍हाप्रमुख विजय देवणे, उत्तर विधानसभेचे शहरप्रमुख सुनील मोदी, दक्षिण विधानसभेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे उपस्थित होते. पवार म्हणाले, स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्यांनी विश्‍वासघात केला आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या बंडखोर आमदार, खासदारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे.

देवणे म्हणाले, गडहिंग्‍लज, चंदगड, आजरा भागातील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांना कोकणातील एजंटाकंडून फोन येत आहेत. व्हॉटस ॲप कॉलिंग, अनोळखी नंबर अशा माध्यमातून कॉल येत आहेत. त्यांचे एजंटही काहींच्या घरी भेटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र शिवसैनिक कट्टर आहे. त्यांच्याकडून गद्दारी केली जाणार नाही. ते अशा एजंटांना भिक घालणार नाहीत, याची विश्‍वास आहे. अशा एंजटांच्या हाती कोणी लागू नये हा सुद्धा बंदोबस्त आम्ही केला आहे.

shiv sena
Panhala Fort : पन्हाळगडावर शिवभक्त एकवटले, मद्यपार्टीनंतर पुरात्तव विभागाला धरलं धारेवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com