
Shivsena Thackeray Group : आगामी निवडणुकांसाठी पक्ष बळकट करून महत्त्व वाढवण्याचे काम केले जाणार आहे. पक्षप्रमुखांना पुन्हा एकदा जिल्ह्यात ताकद वाढवून दाखवू. महापालिकेच्या निवडणुकीत किमान १५ जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट असून, आघाडीतील मित्र पक्षांची ताकद लागली तर काहीच अडचण येणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.