Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Kolhapur crime latest news : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीत अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने विश्वास संपादन केल्याचे समोर आले.
kolhapur Shahuwadi Crime News

kolhapur Shahuwadi Crime News

esakal

Updated on

False marriage promise abuse : शाहूवाडी तालुक्यातील वसीम मणेर या तरुणाने एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील २०२१ पासून अत्याचार केल्याची फिर्याद शाहूवाडी पोलिस ठाण्यात पीडित मुलीने दिली. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याच्यावर ॲट्राॅसिटीसह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com