
Kolhapur Police : शिरोळ येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून वीस वर्षांच्या युवकाला दगडाने व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. दरम्यान, या युवकावर उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. दीपक दशरथ मगदूम (रा. शिवाजीनगर, शिरोळ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित सात जणांना पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे (सर्व रा. शिरोळ) अशी संशयितांची नावे आहेत.