

इचलकरंजीतील लक्ष्मी गुरव ही संशयित महिला गांजा विक्रीसाठी आपल्या ताब्यात पुन्हा बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ ठेवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
esakal
Ichalkaranji Woman Crime News : शहापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी (ता.१०) रात्री तारदाळ गावातील जी.के.नगर परिसरात छापा टाकून एका महिलेच्या ताब्यातून सुमारे २७३ ग्रॅम गांजा जप्त केला. लक्ष्मी आनंदा गुरव (वय ६०, रा. जी.के.नगर, तारदाळ) असे तिचे नाव असून, तिच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वीही गांजा विक्रीप्रकरणी तिच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.