
शिवाजी यादव
कोल्हापूर : पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसचा अतिवेग व लेनकटिंग आदी कारणांमुळे गेल्या सहा महिन्यांत राज्याच्या मोटार परिवहन विभागाने एक कोटी ३३ लाख ३४ हजार इतका दंड केला आहे. कोल्हापुरातील एसटीला १३ लाख ८० हजार इतका दंड झाला आहे. नियमानुसार दंड वाहनाच्या मालकाला केला जातो.