
Minor Driver Accident : कुरुकली - परिते रस्त्यावर भरधाव मोटार पळवत प्रज्ञा कांबळे (वय १८) हिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन चालकाला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित अल्पवयीन चालकाने घटनेआधी रस्त्यावर दोन वेळा मोटारीच्या फेऱ्या मारून ‘इंप्रेशन’ पाडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मोटारीत बसलेल्या तिघांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. चौघांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.