
हसन मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक आणि महादेवराव महाडिक यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे...
esakal
Kolhapur Politics News : ‘ज्यांच्या सासऱ्यांच्या हातात तीस-पस्तीस वर्षे सत्ता होती, त्यांच्या काळात डिबेंचरची पद्धत सुरू झाली. त्यांच्याच नेतृत्वाखाली डिबेंचरविरोधात मोर्चा काढला जातो. मोर्चात दोन-तीन माजी संचालकही होते, त्यांच्याही काळात डिबेंचर कपात होत होती. त्यामुळे लोक अशा ढोंगी माणसांना चांगलेच ओळखतात’, असा पलटवार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’ संचालिका शौमिका महाडिक यांच्यावर त्यांचे नाव न घेता केला. गोकुळ दूध संघात वसुबारसनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या चार वर्षांत उत्पादकांना न्याय दिल्याचेही त्यांनी नमूद केले.