
Shoumika Mahadik
esakal
Gokul Milk Kolhapur Politics : ‘आबाजी..पुढच्या वर्षी आपल्याला वेगळ्या भूमिकेत भेटायचे आहे’, या ‘गोकुळ’ संचालिका शौमिका महाडिक यांनी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने उपस्थित संचालकांच्या भुवया उंचावल्या. यावर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर बसण्यासाठी न दिलेल्या खुर्चीबाबत महाडिक यांनी तक्रार करताच क्षणाचाही विलंब न लावता ‘तुम्हाला व्यासपीठावर मानाची खुर्ची दिली जाते. पण, तुम्हीच कधी मान घ्यायला व्यासपीठावर आला नाही. आजही तुम्हाला व्यासपीठावर खुर्ची ठेवली आहे. तुम्ही अजूनही येऊन बसू शकता,’ असे आवाहन ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले.