esakal | शाहू साखर कारखाना भरवणार कुस्ती स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत कारखान्याच्या बंदिस्त गोदामात स्पर्धा घेण्यात येतील. फेसबुक पेजवरून संपुर्ण स्पर्धेचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शाहू साखर कारखाना भरवणार कुस्ती स्पर्धा

sakal_logo
By
- मतीन शेख

कोल्हापूर: कोरोना महामारीमुळे गेल्या दिड वर्षापासून कोल्हापुरची कुस्ती थांबली आहे. या कुस्तीला चालना मिळावी म्हणून श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत 4 ते 6 ऑक्टोबर 2021 दरम्यान 35 व्या भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. प्रथमच या स्पर्धा प्रेक्षकाशिवाय घेतल्या जात आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त टोकियो ऑलंपिकच्या धर्तीवर या स्पर्धा होणार आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत कारखान्याच्या बंदिस्त गोदामात स्पर्धा घेण्यात येतील. फेसबुक पेजवरून संपुर्ण स्पर्धेचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: कोल्हापूर: सहकारातील निवडणुकांचा धडाका सुरू

श्री.घाटगे म्हणाले, शाहू कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून कारखाना कार्यक्षेत्र व कागल तालुक्यातील उद्योन्मुख नवीन खेळाडूंना संधी मिळावी, या हेतूने 1984 पासून या स्पर्धा होतात. विविध वजनी गटातील विजेत्या मल्लांना कारखान्यामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. कोरोनामुळे कुस्तीपट्टूची कुस्ती थांबली आहे. त्यांना बळ मिळावे या हेतूने प्रशासनाची परवानगी घेत ही स्पर्धा आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी मोजक्याच लोकांना प्रवेश असेल.

हेही वाचा: कोल्हापूर: सहकारातील निवडणुकांचा धडाका सुरू

यामध्ये मल्ल, पंच, वस्ताद स्टाफ यांचा समावेश असेल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मल्लांना कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा करण्यात येणार आहे. शिवाय पालकांची लेखी संमतीही आवश्यक राहील. या कुस्ती स्पर्धा 31 विविध गटांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये 14 वर्षाखालील बाल व 16 वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी 8 गट तसेच 19 वर्षाखालील ज्युनियर 7 व सिनीयर 5 वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील. तसेच महिला कुस्तीगीरांसाठी 45, 55 व 65 किलो अशा तीन वजनी गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: कोल्हापूर: विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या युवकावर पोलीसांची कारवाई

या पत्रकार परिषदेसाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक यशवंत माने, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, हिंदकेसरी दीनानाथसिंह, उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, ऑल इंडिया चॅम्पियन मारुती जाधव, कोल्हापूर महापौर केसरी अमृता भोसले, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, महेश वरुटे, नंदू आबदार, सचिन खोत, अमर पाटील, बाळासो मेटकर, नामदेव बल्लाळ, महिला कुस्तीगीर सृष्टी भोसले, अनुष्का भाट माधुरी चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा: कोल्हापूर: महिला सुरक्षेला प्राधान्य; टवाळखोरांना हिसका

दै.सकाळच्या भुमिकेला प्रतिसाद....

कुस्तीच्या स्पर्धा बंद असल्याने मल्ल आर्थिक विवंचनेत आहेत. महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धा सुरु व्हाव्यात. ही भुमिका घेत दै.सकाळने वृत्तलेखातून सातत्याने पाठपुरावा केला. या भुमिकेस प्रतिसाद देत राजे समरजितसिंह घाटगे यांनी या स्पर्धेची घोषणा केली. यामुळे कुस्तीच्या फड परत रंगू लागतील.

सहकार क्षेत्राने कुस्तीला बळ द्यावे...

बहूतेक शेतकऱ्यांची मुले कुस्ती क्षेत्रात आहेत. गरीब परिस्थितीतून येत पैलवानकी करणे अवघड जाते. शेतकऱ्यांच्या घरातील कुस्ती टिकली तर महाराष्ट्राची कुस्ती टिकेल. तरी साखर कारखाने, दुध संघ या संस्थानी स्पर्धा आयोजित करत मल्लांना मानधन सुरु करावे, असे आवाहन समरजितसिंह घाटगे व पै. अमोल बुचडे यांनी केले.

हिंद केसरी, महाराष्ट्र केसरींच्या मानधनाच्या विषयाचा पाठपुरावा करावा...

राज्य सरकारकडून माजी महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी यांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. या मानधनात रेशनची व्यवस्था देखील होत नाही. तरी शाहू महाराजांचा कुस्तीचा विचार पुढे नेणार समरजित राजे यांनी मानधनाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करावा, अशी विनंती हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी यावेळी केली.

loading image
go to top