जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी  देण्याच्या मागणीसाठी  मूक निदर्शने

Silent protests were held in front of the justice complex at Raman Mallya on behalf of the city action committee
Silent protests were held in front of the justice complex at Raman Mallya on behalf of the city action committee

कोल्हापूर : कोरोनावर उपचारासाठी दवाखाने, यंत्रणा अपूरी पडत आहेत. जिल्हा न्यायालयाची जुनी मोठी इमारत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सी.पी.आर) लागूनच आहे. ती आज बहुतांशी वापराविना आहे. ही इमारत सीपीआर प्रशासनाला द्यावी, या मागणीसाठी आज नागरी कृती समितीच्यावतीने रमण मळ्यातील न्याय संकुलाच्या समोर मूक निदर्शने करण्यात आली.जुन्या इमारतीचा न्यायालयासाठी काहीच उपयोग दिसत नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मानवी जीवांचे रक्षण व उपचार करणे ही बाब प्राधान्याने हाती घेतली पाहिजे.


न्यायालयाच्या रिकाम्या इमारतीमध्ये सी. पी. आर. चे विस्तारीकरण केले, तर त्या ठिकाणी सर्व सुविधा देता येऊन जास्तीत जास्त रुग्णावर उपचार होऊन अनेक जीव वाचतील. न्यायालयाची जुनी इमारत हॉस्पिटलसाठी वापरात घेणे अत्यंत गरजेचे आहे. 


कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने  मूक निदर्शने झाली. यामध्ये अशोक पवार, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, महादेव पाटील, चंद्रकांत पाटील ,लहू शिंदे ,महादेवराव जाधव, रणजित पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, दीपक बागडी, बाळासाहेब कांबळे, राजेश वरक,, परवेज सय्यद, विक्रांत पाटील, राजू मालेकर,सुनीलकुमार सरनाईक, चंद्रकांत बराले विनोद डुणूग आदींचा सहभाग होता.  

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com