esakal | संचारावर निर्बंध, रस्त्यावर गर्दी तुडुंब; कोल्हापुरातील बंदचे चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

संचारावर निर्बंध, रस्त्यावर गर्दी तुडुंब; कोल्हापुरातील बंदचे चित्र

संचारावर निर्बंध, रस्त्यावर गर्दी तुडुंब; कोल्हापुरातील बंदचे चित्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रेट (postitive rate) कमी येत नसल्याने प्रशासनाने आजपासून निर्बंध कडक केले; पण संचारावर निर्बंध, रस्त्यावर गर्दी तुडुंब असेच चित्र शहरातील रस्त्या रस्त्यावर पाहायला मिळाले. सोमवारपासून दुकाने उघडणारच अशी व्यापाऱ्यांनी घेतलेली भूमिका आज मवाळ केली. बहुतांशी दुकाने बंदच होती. काही व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मागील दाराने विक्री सुरू होती. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. लोकांचा एकमेकांशी अधिक संपर्क येऊ नये म्हणून निर्बंध कडक केले होते. मात्र प्रशासनाच्या या निर्णायाला हारताळ फासला गेल्याचे आजच्या गर्दीवरून दिसते.

राज्यातील कोरोनाची (covid-19) रुग्ण संख्या कमी झाली असली तरी कोल्हापुरातील रुग्णसंख्या पंधराशे ते दोन हजार या दरम्यान आहे. त्यामुळे प्रशासनाने पाच दिवसांसाठी शिथिल केलेले निर्बंध सोमवार (१२) पासून अधिक कडक केले. या मध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने, मॉल्स, उपहारगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या उपाययोजना केल्या होत्या. मात्र आज दिवसभरात शहरातील (kolhapur city) सर्व रस्त्यावरून गर्दीचे लोंढे दिसत होते. चौकाचौकामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. सकाळी मंडईमध्येही भाजी खरेदीसाठीही गर्दी होती. येथे सोशल डिस्टन्सिंगचे (social distance) नियम पाळले जात नव्हते.

हेही वाचा: 26 जुलैपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतुकीस बंद; प्रशासनाचा निर्णय

मुख्य रस्त्यावर गर्दी होती. महाद्वाररोड परिसरात फेरीवालेही रस्त्यावर होते. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सोमवार पासून दुकाने सुरू करणार अशी भूमिका घेतली होती. मात्र प्रशानाने निर्बंध लागू केल्यानंतर व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भितीने नमती भूमिका घेतली. शहरातील बहुतांशी दुकाने बंद होती. मात्र काही व्यापाऱ्यांनी दुकानाचे मागचे दार उघडून ग्राहकांना सेवा दिली. समोरून शटर बंद असले तरी मागून सेवा सुरू होती. शहरातील सर्व भागांमध्ये अशा प्रकारे व्यापार सुरू होता. राजारामपुरी, शाहुपूरी येथील शोरुम्स, सराफी दुकाने, बंद होती. खासगी आस्थापनां देखील सुरू होत्या. एका अर्थाने संचारावर निर्बंध केवळ कागदावरच होते. रस्त्यावर मात्र गर्दी होती.

दुकाने बंद असूनही नागरिकांची गर्दी होती. याचा अर्थ प्रशासनाला गर्दी नियंत्रणात आणता आली नाही. लॉकडाउनला कोणताही शास्त्रीय आधार नाही. कोरोना दुकानावरची पाटी वाचून आतमध्ये जातो का, चारनंतर तो सक्रिय नसतो का. निर्णयाचा केवळ ठरावीक व्यापाऱ्यांनाच फटका बसतो आहे. व्यापाऱ्यांच्या भावना टोक्याचा आहेत. प्रशासनाने सहानभुतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा संतापाचा उद्रेक होईल.

- ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स

हेही वाचा: कागलमध्ये जेसीबीमधून गुलालाची उधळण करणं पडलं महागात

शहरातील दुकाने ९७ दिवसांपासून बंद आहेत. तरीदेखील नागरिकांची वर्दळ आहे. व्यापार बंद ठेवून सरकार काय साध्य करणार आहे? लवकरात लवकर सरकारने दुकाने सुरू करावीत. तसेच लॉकडाऊनकाळातील मिळकत कर, व्यावसायिक कर, वीज बिल माफ करावे.

- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स

loading image