कोल्हापूर : सोळा शेतकऱ्यांनी उभारले आधुनिक गुऱ्‍हाळघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुऱ्‍हाळ घर
कोल्हापूर : सोळा शेतकऱ्यांनी उभारले आधुनिक गुऱ्‍हाळघर

कोल्हापूर : सोळा शेतकऱ्यांनी उभारले आधुनिक गुऱ्‍हाळघर

कोल्हापूर : गावातील उसाचे गाळप गावातच व्हावे, शेतकऱ्यांना(farmer) योग्य मोबदला योग्य वेळी मिळावा, यासाठी १६ तरुण शेतकरी (Young Sixteen farmers)एकत्रित आले. एक एकरात त्यांनी आधुनिक गुऱ्‍हाळ घर सुरू केले. येथे गूळव्याची गरज भासत नाही, असे तंत्रज्ञान (Technology)उभे केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना साखर कारखान्याइतकाच (sugar factory) दर केवळ १५ दिवसांत खात्यावर जमा करून दिला आहे. पहिल्या वर्षी २५०, तर दुसऱ्याच वर्षी दोन हजार टन क्रशिंग झाले. मजले (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांची ही यशोगाथा आहे.

हेही वाचा: मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

एका धार्मिक कार्यक्रमांतून गावकरी एकत्रित आले. पुढे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गाव आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी चर्चा सुरू झाली. यातूनच कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील मजले येथील सचिन पाटील यांनी आधुनिक गुऱ्हाळघर उभारण्याची संकल्पना मांडली. गुऱ्हाळ घरे बंद होत असताना तोच व्यवसाय करायचा, हे धाडस होते. तरीही ६० दिवसांत सेटअप तयार केले. सर्वांनी कामे वाटून घेतली. येथे एकमेकांच्या कामात हस्तक्षेप होत नाही. मात्र, सर्व कामांची माहिती रात्री गुऱ्हाळघरावर एकत्रित येऊन दिली जाते.

हेही वाचा: बाळूपाटलाच्या वाडीतील युवकाचा मारहाणीत मृत्यू 

तूट नसल्याने फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आणि यातून त्यांनी विनासाखर, विनाकेमिकलचा गूळ तयार केला. म्हणून मागणी वाढली आहे. या स्टार्टअपमधून शेतकऱ्यांना उसाचा योग्य मोबदला विनात्रास मिळू लागला. कोल्हापुरातील ब्रँडने महाराष्ट्रासह कर्नाटकात नाव मिळविण्यास सुरुवात केली. आता परदेशातूनही मागणी आहे. मार्केटिंगसाठी आउटलेटही सुरू केली आहेत. कॅनरा बॅंकेचे अर्थसहाय्य, तालुका व कृषी विभागाचेही विशेष सहकार्य लाभले. सुरुवातीला प्रत्येक शेतकऱ्याने दोन लाखांचे भांडवल गुंतविले. आता एक कोटींचा हा प्रकल्प बॅंकेचे कर्ज घेऊन उभा केला आहे. यासाठी सीए सतीश डकरे, शिवाजी विद्यापीठातील अधिविभागप्रमुख एम. ए. गुरव यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम गावाच्या विकासासाठीही वापरली जाते.

हेही वाचा: चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

गुळासह उपउत्पादनेही...

केवळ गुऱ्‍हाळघर अपडेट करून ते थांबले नाहीत, तर गूळकॅन्डी, गूळपावडर, काकवी, गुळाचा चहा अशी उपउत्पादने घेऊन त्यांनी यशाची कमान अवघ्या दोन वर्षांत उंचावली आहे. त्याची उत्पादने आता मुंबई, पुणे, तिरुपती, यवतमाळसह कर्नाटकात आणि परदेशातही पोचली आहेत. मागणी वाढली. मात्र, उत्पादन कमी होत आहे. आता उत्पादन वाढीसाठी हे शेतकरी झटतात. सध्याचा व्यवसाय आणखी १६ पट वाढविण्याचा मानस आहे.

यांचा सहभाग

सुभाष पाटील, अमित मगदूम, रवींद्र पाटील, अभिषेक उपाध्ये, अमोल पाटील, शार्दृल चौगुले, अभिजित पाटील, भरत पाटील, सूरज पाटील, सुजाता पाटील, कविता कुंभोजे, विपुल पाटील, संदेश पाटील, शांतिनाथ पाटील, योगेश पाटील, सचिन पाटील आदी शेतकरी भूधन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावाखाली एकत्रित आले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurFarmerjaggery
loading image
go to top