Smart Meter Fire Kolhapur : स्मार्ट मीटरने अचानक घेतला पेट, कोल्हापुरातील कागलमधील घटना, महावितरणचा खुलासा

Smart Meter Catches Fire : कोल्हापूरच्या कागलमध्ये स्मार्ट मीटरला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या घटनेमागील कारणाबाबत महावितरणने खुलासा करत ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली.
Smart Meter Fire Kolhapur kagal nanibai chikhali

Smart Meter Fire Kolhapur kagal nanibai chikhali

esakal

Updated on

Kagal Smart Meter Incident : (रमजान कराडे) : कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली ( ता. कागल ) येथे महावितरणने महिन्याभरापूर्वी बसविलेल्या नवीन स्मार्ट मीटरने गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रहिवासी रवींद्र चिमगावकर यांच्या घरी हा प्रकार घडला. घटनेत स्मार्ट मीटर पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीती आणि नाराजी व्यक्त होत आहे.

रवींद्र चिमगावकर यांच्या घरात महावितरणच्या मुरगूड शाखेकडून सुमारे महिण्यापूर्वी स्मार्ट मीटर बसविण्यात आले होते. गुरुवारी सकाळी मीटरने पेट घेतला. त्यानंतर मीटरला आग लागून ते पूर्णपणे जळून गेले. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान राज्यभरातील गावागावात महावितरणच्या स्मार्ट मीटर बदलण्याच्या मोहिमेला वीज ग्राहकांमधून तीव्र विरोध होताना दिसत आहे. असे असतानाही महावितरणकडून जाणीवपूर्वक चुपके चुपके मीटर बसवण्याचे काम सुरूच आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता जुने चालू असलेले मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरूच ठेवल्याने ग्रामीण भागातून विरोध होताना दिसत आहे.

​घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर आणि स्मार्ट मीटरच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच वाढीव बिलाच्या भीतीने तसेच कोणत्याही क्षणी लाईट बंद होणार यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये आता या अचानक मीटरने पेट घेतल्याने सुरक्षेची चिंता वाढली असून, गावातून स्मार्ट मीटर हद्दपार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महावितरणकडून महिण्यापूर्वी बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरने अचानक पेट घेतला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जर मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण ? या प्रकारामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत महावितरणने स्पष्ट भूमिका घ्यावी.

- रवींद्र चिमगावकर, रहिवासी, नानीबाई चिखली

सदर मीटर तांत्रिक बिघाडामुळे जळाले असण्याची शक्यता असून, मीटर चाचणीसाठी चाचणी विभागाकडे पाठविण्यात येत आहे. संबंधित ग्राहकास तात्काळ नवीन स्मार्ट मीटर बसवून वीजपुरवठा सुरक्षितपणे व सुरळीत सुरू करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीसाठी महावितरणाशी संपर्क साधावा.

– आकाश पुरेकर कनिष्ठ अभियंता, महावितरण लिंगणूर (कापशी) शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com