

Demand to Remove Faulty Smart Meter
sakal
घुणकी : वाठार (ता. हातकणंगले) येथील शेतकरी बापू भिम्माण्णा चौगुले यांचे घरगुती वीज बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांना तब्बल २ लाख ३३ हजार ८९० रुपयांचे वीज बिल आले. त्यामुळे शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) वाठार तर्फ वडगाव येथील वीज महावितरण कार्यालयातील शाखा अभियंता अमोल तावरे यांचा वीज बिलाच्या निषेधार्थ उपहासात्मक सत्कार करून निषेध नोंदवला.