सहा इंचाची मोबाईल स्क्रीन बनतीये इच्छुक उमेदवारांच व्यासपीठ ; फेसबुक ‘माय स्टोरी’ची रंगतीये चर्चा

social media story for election campaign in kolhapur
social media story for election campaign in kolhapur
Updated on

कोल्हापूर : महापालिकेचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी इच्छुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. फेसबुक ‘माय स्टोरी’, व्हॉट्‌सॲप स्टेटस माध्यमातून प्रचाराची मूहुर्तमेढ रोवली आहे. हिंदी, मराठी गाणी व ॲनिमेशन वापरून इच्छुक निवडणुकीत उतरण्याचा आपला मानस व्यक्त करीत आहेत. त्यांच्या फेसबुक स्टोरी भागात चर्चेचा विषय ठरत आहेत. सहा इंचाची मोबाईल स्क्रीन हेच त्यांचे व्यासपीठ बनले आहे.

प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचे तंत्र बदलते आहे. एकेकाळी सार्वजनिक भिंती रंगवणे हे प्रचाराचे तंत्र होते. कार्यकर्त्याची कल्पकता त्या भिंतीवरून दिसत होती. असे भिंती रंगवणारे त्यावेळचे कार्यकर्ते आता राजकारणात मोठ्या पदांवर आहेत. त्यानंतर पत्रके, वर्तमानपत्रातील जाहिराती हे प्रचाराचे मुख्य माध्यम बनले. त्यानंतर डिजिटल बॅनरवरून प्रचार रंगू लागला. वृत्तवाहिन्यांवरील जाहिरांतीनीही एक काळ मतदारांना आकर्षित केले. या सगळ्या स्थित्यंतरानंतर सोशल मीडियाने निवडणूक प्रचाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत.

सहा-सात वर्षांपूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावरून जोरात प्रचार झाला. नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यकर्तेही सोशल मीडियावरून प्राचरात ‘एक्‍टीव्ह’ झाले. परस्परांचे वाभाडे काढण्याची एकही संधी त्यांनी सोडले नाही. निवडणूकपूर्व सर्वेक्षण, पक्षांचा जाहिरनामा, नेत्यांच्या जाहीर सभा सर्वकाही या सोशल मीडियावरून ‘व्हायरल’ झाले. गेल्या महापालिका निवडणुकीतही सोशल मीडियाच प्रचारात आघाडीवर होता. यंदाही निवडणुकीत सोशल मीडियाचाच बोलबाला आहे. 

महापालिका निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तरीदेखील इच्छुकांनी आरक्षण सोडत झाल्यापासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या नावाची घोषणा करणे हा होता. यासाठी त्यांनी ‘फेसबूक स्टोरी’चा उपयोग केला. फेसबुकवरील माय स्टोरी या पर्यायाचा कौशल्याने वापर करून त्यांना आपल्या नावाची भागात चर्चा सुरू केली. यासाठी स्वतःचा एखादा व्हिडिओ बनवून त्याला महापालिकेच्या इमारतीचे छायाचित्र देऊन तो व्हायरल केला.

यासाठी ‘तु चाल पुढे तुला भीती कुणाची’, मनकर्णिका चित्रपटातील ‘विजयी भव’ ही गाणी सर्वाधिक वापरली गेली. तरतऱ्हेचे व्हिडिओ भागात चर्चेचे विषय ठरले. नेत्यांची छायाचित्रे लावून अनेकांनी आपली राजकीय दिशाही स्पष्ट केली. व्हॉस्टॲप स्टेटसवरही असे व्हिडिओ सध्या दिसत आहेत. मोबाईल टिझर, इन्स्टाग्राम व्हिडिओ, इन्स्टारिल या माध्यमातून इच्छुकांना मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष प्रचारातही याचाच प्रभाव अधिक असेल असे जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. एकूणच सध्या मोबाईल टिझर, फेसबूक स्टोरी हे प्रचाराचे व्यासपीठ झाले आहे. 

सोशल मीडिया सेल कार्यान्वित 

राजकीय पक्षांचे सोशल मीडिया सेलही कार्यान्वित झाले आहेत. त्यांनी नागरी समस्या, राजकीय मुद्दे यांच्या आधारे आपल्या ‘कनसेप्ट’ बनवण्यास सुरवात केली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी विविध पर्यायंचा वापरही सुरू आहे. 

"कोरोनाकाळात मानवी जीवनावर असणारा सोशल मीडियाचा प्रभाव अधिक लक्षात आला. या नवीन माध्यमाचा उपयोग निवडणुकीच्या प्रचारात गेल्या पाच ते सहा वर्षात होतोच आहे. मात्र, कोरोनानंतर तो अधिक होईल. महापालिका निवडणुकीत याचा वापर अधिक होणार आहे. कारण हे स्वस्त व मतदारापर्यंत अल्पावधीत पोचणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे निवडणुकीत नेत्यांच्या सभा फेसबुक लाईव्हवर चालतील. मात्र, या माध्यमाची क्षमता व बारकावे ओळखून जर प्रचार केला गेला तरच तो परिणामकारक होईल. सोशल मीडियाच्या माध्यमाला चांगल्या कंटेटची जोड देणे आवश्‍यक आहे."

- शैलेश गर्दे, कर्मशिअल आर्टिस्ट

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com