आता गावोगावी होणार माती परीक्षण  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soil testing will be done in nipani village

निपाणी तालुका : पहिल्या टप्प्यात १६ गावात तपासणी

आता गावोगावी होणार माती परीक्षण 

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी  : जमिनीच्या आरोग्यासाठी कृषी खात्याकडून तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व जमिनीच्या सर्व्हे क्रमांकानुसार मोफत माती परीक्षण केले जात . मात्र आता प्रत्येक जमिनीतील मातीचे परीक्षण बंद झाले असून गावातील एकाच शेतकऱ्याच्या शेतजमिनीतील मातीचे सॅम्पल घेण्यात आले आहे . निपाणी कृषी विभागात १६ गावांची निवड झाली असून तेथील प्रत्येकी एका शेतकऱ्याच्या जमिनीतील मातीचे सॅम्पल गोकाक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 


शेतातील प्रातिनिधीक मातीच्या नमुन्यांचे पृथःक्करण करून त्यातील मुख्य , दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून अहवालानुसार पीक आणि खतांचे नियोजन माती परीक्षणातून होते . या आधी पहिल्या टप्प्यात भिवशी ( ता . निपाणी ) येथील प्रत्येक शेतजमिनीतील मातीचे परीक्षण झाले . त्यानंतर खात्याने पुन्हा माती परीक्षणासाठी काही गावांची निवड केली .

हेही वाचा- कोल्हापुरातील बिंदू चौक-बुरुज आणि‌ तटबंदी

मात्र त्यानंतर प्रत्यक्षात मातीचे नमुने घेऊन परीक्षण करण्याचे आदेश आले नाहीत . त्यामुळे तालुक्यात माती परीक्षण उपक्रम रेंगाळला होता . पण काही दिवसापूर्वी खात्याने प्रत्येक जमिनीतील मातीचे सॅम्पल घेण्याऐवजी गावातील एकाच शेतकऱ्याच्या जमिनीतील मातीचे सॅम्पल घेण्यास सांगितले आहे . त्यानुसार १६ गावातील जमिनीतील मातीचे सॅम्पल घेण्यात आले आहेत . आता त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबधित शेतकऱ्याच्या जमिनीत कोणते घटक आवश्यक आहेत , त्यादृष्टीने खताची मात्रा पुरवली जाणार आहे . या जमिनीत उत्पन्न चांगले आल्यास इतर शेतकऱ्यांना एकत्र करून आवश्यक खतमात्रेबद्दल जागृती होणार आहे . त्यासाठी कृषी खात्याचे सहकार्य मिळणार आहे .
 

निवड झालेली गावे अशी : जत्राट , गव्हाण , लखनापूर , निपाणी , अक्कोळ , कोगनोळी , बेनाडी , यरनाळ , भिवशी , शेंडूर , बुदिहाळ , तवंदी , आडी , हंचिनाळ (के. एस. ) , कुर्ली , आप्पाचीवाडी.  


'खात्याच्या नव्या निर्देशानुसार प्रत्येक शेतजमिनीतील मातीचे परीक्षण होणार नाही , गावातील एकाच शेतकऱ्याच्या जमिनीतील मातीचे परीक्षण होईल . सध्या निवड झालेल्या १६ गावातील मातीचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठविले आहे . अहवाल आल्यावर त्यानुसार जमिनीत खतमात्रा पुरवली जाईल . त्यानंतर या शेतकऱ्यांनी गावातील अन्य शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कार्य करायचे आहे .' 
-पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, निपाणी 

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top