कोल्हापूरच्या सुपुत्राने केले दृष्टी सक्षम करणारे सोलर सेलचे संशोधन 

Solar cell research kolhapur dr sharad vhanalkar
Solar cell research kolhapur dr sharad vhanalkar
Updated on

कोल्हापूर - वाढत्या वयानुसार व्यक्तीच्या दृष्टीमध्ये फरक जाणवायला लागतो. प्रकाशाचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करून ती ऊर्जा मेंदूकडे पाठविण्याचे काम डोळ्यांतील रेटिनल मज्जातंतुकडून केले जाते. डोळ्यांच्या दृिष्टपटलातील हा रेटिना कुमकुवत होऊन त्याचा दृष्टीवर परिणाम होतो. यावर पर्याय शोधत सोलर सेलचा मानवी डोळ्यांत वापर करून दृष्टी सक्षम करण्याचे संशोधन कोल्हापुरातील एका युवकाने केले आहे. प्राथमिक अवस्थेत उंदरावरील प्रयोग यशस्वीही झाला आहे. तुर्की देशातील कोच विद्यापीठातील  संशोधनात निगवे खालसा (करवीर) येथील डॉ. शरदराव आनंदराव व्हनाळकर यांचा मोलाचा वाटा आहे.

डॉ. व्हनाळकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण गोखले कॉलेजमध्ये झाले. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात एमएस्सी पूर्ण केल्यानंतर ‘कॉन्टम डॉट सेन्सटाईज्‌ड सोलर सेल’ या विषयात पीएच.डी. मिळवली. प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या लिक्विड मटेरियलमुळे ऊर्जानिर्मितीच्या प्रक्रियेत काही समस्या निर्माण होतात. त्याचवेळी घन पदार्थांपासून जर सौरघट तयार करताना सीझेडटीएस धातू व अधांतूचे मिश्रण वापरल्यास ही प्रक्रिया सोपी होते, हे सिद्ध केले. त्यांना युजीसीची रमण फेलोशिप मिळाली. या फेलोशिपमध्ये त्यांना अमेरिकेत संशोधन करण्याची संधी मिळाली. तेथील आयवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्येही त्यांनी काही काळ ‘परस्काईट सोलर सेल’ वर संशोधन केले. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना तुर्की सरकराकडून टुबी टॅक फेलोशिप मिळाली. याच्या माध्यमातून त्यांनी सोलर सेलचा मानवी डोळ्यांतील वापर या विषयातून संशोधन करत आहेत. प्रा. सेदात नेजामाबिलू यांच्यासोबत हे संशोधन सुरू आहे. सध्या ते गारगोटीतील कर्मवीर हिरे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajaram Stadium Ichalkaranji drug injection news
Maharashtra School Recruitment
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
newborn choking incident while feeding milk
Marathi News Esakal
www.esakal.com