

Kolhapur
esakal
Solar Panel Pipe Shock : सोलर पॅनल बसविण्यासाठी साहित्य टेरेसवर नेताना एका पाईपचा मुख्य वाहिनीला स्पर्श होऊन विजेचा झटका बसल्याने रवींद्र रंगराव जाधव (वय ५२, रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ) यांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घराच्या टेरेसवर हे साहित्य घेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सौरभ संजय साळुखे (वय २४, रा. ताराबाई रोड, मूळ रा. तासगाव) जखमी झाला.