
इचलकरंजी : शहरात पसरलेल्या अवैध मावा विक्रीच्या ‘खेळाडू’ पान शॉपच्या साम्राज्यामागे अंधारलेली, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एका खुनाच्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या एका म्होरक्याने तुरुंगातून बाहेर पडताच माव्याच्या व्यवसायात उडी घेतली आणि अगदी काही वर्षांत तब्बल ३५ पान शॉप्स उभारून स्वतःचे काळे ‘खेळाचे मैदान’ तयार केले आहे.