स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे यांनी दिला राजीनामा

Standing Committee Chairman Sandeep Kawale resigned
Standing Committee Chairman Sandeep Kawale resigned
Updated on

कोल्हापूर - स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे यांनी आज वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार हा राजीनामा दिला गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन पाटील यांना आता नूतन सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या राजकारणात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पाच वर्षांचा सत्ता फॉर्म्युला निश्‍चित केला आहे. त्यानुसार कॉंग्रेसकडे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस महापौर, स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांचे वाटप झाले आहे. कवाळे यांना मार्चमध्ये स्थायी समितीचे सभापती म्हणून संधी देण्यात आली. वर्षभरासाठी हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आले आहे. उर्वरित काळासाठी फुटबॉल खेळाडू सचिन पाटील यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, महापौर निलोफर आजरेकर यांच्या राजीनाम्याकडेही आता लक्ष लागून राहिले आहे.

आजरेकर कॉंग्रेसच्या कोट्‌यातून महापौर झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाची पदे देताना त्याचा कालावधी निश्‍चित केला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापौर आजरेकर व स्थायी समिती सभापती कवाळे यांना मुदतवाढ मिळाली होती. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीपर्यंत पुढे जाण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अन्य इच्छुकांनाही संधी मिळावी, यासाठी कवाळे यांचा राजीनामा झाल्याचे समजते. महापौर आजरेकर यांच्या राजीनाम्याकडे कॉंग्रेस इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यांचा राजीनामा झाल्यास या पदासाठी इंदूमती माने, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे यापैकी एका महिलेला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. कोव्हिडच्या काळात विभागीय आयुक्त नव्या निवडीला परवानगी देतात की नाही, हेही महत्त्वाचे आहे. शिक्षण समिती व अन्य विषय समितीच्यां निवडीकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

संपादन - मतीन शेख

.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com