विधान परिषदेला इचलकरंजीतून ८० ते ८५ मतदान मिळेल - सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषदेला इचलकरंजीतून ८० ते ८५ मतदान मिळेल - सतेज पाटील

विधान परिषदेला इचलकरंजीतून ८० ते ८५ मतदान मिळेल - सतेज पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : विधान परिषद निवडणूकीत मला इचलकरंजीतून ८० ते ८५ टक्के मतदान मिळेल, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला. त्यांनी आज दिवसभर शहरातील महाविकास आघाडीसह ताराराणी आघाडीतील नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर यशोदीप भवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: दिल्लीत LOCKDOWNची तयारी; आठवडाभर शाळा बंद!

विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथमच मंत्री पाटील आज शहरात आले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. सुरुवातीला त्यांनी शिवतीर्थ येथे भेट देवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी शहरातील आपल्या दौ-यास सुरुवात केली. दिवसभरात त्यांनी विविध ठिकाणी भेट देवून महाविकास आघाडीसह ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची भेट घेतली. खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे त्यांच्यासमवेत होते.

येथील यशोदीप भवन येथे मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, इचलकरंजीतील नगरसेवकांच्या आज दिवसभर भेटीगाठी घेतल्या. या संपर्क मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे इचलकरंजीतून साधारणपणे ८० ते ८५ टक्के मतदान आपणास मिळेल, असा विश्वास आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याचा अनुभव नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांचे पाठबळ नक्कीच मळा मिळणार आहे. शहरातील कचरा आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. महापालिका करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय केल्यास त्यासोबत आपणही असणार आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

विरोधकांचे आव्हान आपण गांभीर्याने घेत आहे, असे स्पष्ट करीत पाटील म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवीत आहोत. विरोधकांनी जरी आव्हान दिले असले तरी आम्ही आमची व्यूहरचना यशस्वी करणार आहोत. त्यामुळे निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीत कोणतीही दुफळी नसून ती एकसंध आहे. याबाबत केवळ अफवा पसरवली जात आहे. सगळीकडे आपणास चांगला पाठिंबा मिळत आहे. सद्या २५३ च्या पुढे आपल्याबाजूने मतदानाची आकडेवारी आहे. कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांचे मतदान नसले तरी काय फरक पडणार नाही. यावेळी गुलाबराव घोरपडे, नगरसेवक शशांक बावचकर, राहूल खंजीरे, मदन कारंडे, संजय कांबळे, विठ्ठल चोपडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, महादेव गौड आदी उपस्थीत होते.

loading image
go to top