Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह वळवाचा तडाखा; शहरात तीन ठिकाणी वीज कोसळली, जिल्ह्यात गारपीट

Kolhapur Rain Update : वादळी वाऱ्यासह आलेल्या वळवाच्या पावसामुळे शहरात तीन ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून जिल्ह्यात अनेक भागांत गारपीट झाली आहे.
extreme weather

extreme weather

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात सायंकाळी अचानक पडलेल्या या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पाचगावमध्ये काही काळ गारा पडल्या. शहरात तीन ठिकाणी वीज कोसळली. राजाराम चौक येथे ट्रान्स्फार्मर पेटला; परंतु कोणीही जखमी झाले नाही. दिवसभर अंगाची लाहीलाही करणारा उष्मा होता. सायंकाळी चारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन उकाडा आणखीन वाढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com