Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

emotional family tragedy : “बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा...” असे शेवटचे शब्द बोलल्यानंतर विद्यार्थिनीच्या घटनेने खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी नाकारले अन् मुलीने उचललं टोकाचं पाऊल.
Kolhapur Student Death Case cyber fraud

Kolhapur Student Death Case cyber fraud

esakal

Updated on

student incident investigation : वीस हजार गुंतवा पन्नास हजार रुपये मिळणार आहेत... अशा भूलथापांना आकांक्षा बळी पडली. तिने वडिलांना फोन करून तातडीने पैसे पाठविण्याची मागणी केली. ‘असे कधीही पैसे येत नसतात. तू सायबर गुन्ह्यात अडकू नको’ असे वडिलांनी समजावून सांगत पैसे पाठविण्यास नकार दिला. कुटुंबीयांना ही बाब समजणार, आपले पैसे जाणार अशा द्विधा मनस्थितीत आकांक्षा अनिल जोशी (वय १९, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) हिने महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवले. सायबर गुन्हेगारांमुळेच आमच्या मुलीचा जीव गेला असून, याचा सखोल तपास करा, अशी मागणी आता आकांक्षाचे कुटुंबीय करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com