

Success Story Woman Army
esakal
Woman Army Officer Sai Jadhav : डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमीला ९३ वर्षांचा इतिहास. स्थापनेपासून आजवर ६७ हजारांहून अधिक लष्करी अधिकारी करण्याचा मान या ॲकॅडमीला आहे. येथे दिले जाणारे सहा महिन्यांचे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. या प्रशिक्षणात सोळा पुरुषांसमवेत एकमेव महिला कॅडेट. घरी लष्करी परंपरा असल्याने जिद्द व चिकाटीची प्रचिती देत ॲकॅडमीतून ती पहिली महिला कॅडेट म्हणून उत्तीर्ण झाली. विशेष अभिमानाची बाब म्हणजे या कोल्हापूरच्या कन्येचे नाव सई संदीप जाधव. अवघ्या तेविसाव्या वर्षी तिने प्रादेशिक सेना अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला असून, कुटुंबाच्या लष्करी परंपरेचा वारसा सुवर्णमय केला आहे.