
Sugarcane FRP Decision : उसाची एफआरपी देताना ज्या-त्या वर्षीचा साखर उताराच ग्राह्य धरावा, असा खुलासा केंद्र सरकारने शुक्रवारी एका परिपत्रकाद्वारे केला आहे. यामुळे गेल्या हंगामात उताऱ्यापेक्षा कमी-जास्त दर दिलेल्या कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. बहुंताशी कारखान्यांचा गेल्यावर्षीचा ताळेबंद पूर्ण होऊन प्राप्तिकराचीही पूर्तता झाल्याने जादा पैसे दिलेल्या कारखान्यांसमोर अर्थिक अडचणी शक्य आहेत.