कोल्हापूर: साखर कारखान्यांशी संबंधित मतदार, त्यात काम करणारे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी डोळ्यापुढे ठेवून प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची गणिते जुळवली जात आहेत. .त्यामुळे या निवडणुकीवर ‘शुगर लॉबी’चा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. पक्ष आणि उमेदवारांपेक्षा साखर कारखान्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचे ऐकूनच उमेदवार आणि मतदारांनाही रणनीती ठरवावी लागणार आहे..Kolhapur News: शेतकऱ्यांच्या मनातील मोठा प्रश्न ‘कोणाचा कारखाना अधिक दर देतो?’ याच तुलनेवर उमेदवारांचे भविष्य ठरणार!.जिल्ह्यात जवळपास १६ सहकारी आणि पाच खासगी साखर कारखाने आहेत. जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा व विधान परिषदेच्या दोन आमदारांपैकी सात आमदार थेट साखर कारखान्यांशी संबंधित आहेत. त्यातही बहुंताशी आमदार हे आपआपल्या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. .या जोरावर ते कारखाना कार्यक्षेत्रात तर दबदबा निर्माण करू शकतातच; पण आजूबाजूच्या एक-दोन तालुकेही त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतील, अशी ताकद त्यांच्याकडे आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील सोडले तर साखर कारखान्यांशी संबंधित उर्वरित सहा आमदार हे महायुतीचे आहेत. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असल्याचा फायदा या सर्वांना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे..Kolhapur News: ऊस वाहतूक वाहनांचा डेंजर झोन: खड्डे, अंधार आणि अस्ताव्यस्त पार्किंगने वाढला अपघातांचा धोका!.वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, ‘शाहू’चे समरजितसिंह घाटगे, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा ‘मंडलिक-हमिदवाडा’, शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा ‘शरद’, हुपरीतील आमदार राहुल आवाडे यांचा ‘जवाहर’, .करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांचा ‘कुंभी’, करवीर व दक्षिणसह हातकणंगलेचे कार्यक्षेत्र असलेला आमदार अमल महाडिक यांचा ‘राजाराम’, शाहूवाडी व पन्हाळ्यातही वर्चस्व असलेल्या डॉ. आमदार विनय कोरे यांचा ‘तात्यासाहेब कोरे-वारणा’, दरवर्षी ऊस दराचा उच्चांक ठेवणारे माजी आमदार के. पी. पाटील यांचा ‘बिद्री’, गणपतराव पाटील यांचा ‘दत्त-शिरोळ या कारखान्यांच्या माध्यमातून संबंधितांचा जिल्हा परिषद, पंचायत समितीत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असेल..यापैकी अनेकांचे आपल्या स्वतःच्या तालुक्याबरोबरच त्याला लागून असलेल्या तालुक्यातही प्रभाव आहे. या जोरावर उमेदवारी ठरवण्यापासून ते विरोधात जाणाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न होणार आहेत. याशिवाय प्रत्यक्ष मतदानातही सभासदांच्या जोरावर संबंधित कारखानदार आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ताकद लावणार आहे. या ‘शुगर लॉबी’चा प्रभाव मोडून काढणे हेच मोठे विरोधकांसमोरचे आव्हान असेल..नगरपालिका निकालावरही गणिते अवलंबूनप्रत्यक्ष निवडणुकीत कोण कोणासोबत असेल त्यावर निकालाचे चित्र अवलंबून आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी नगरपालिका, नगरपंचायतीचा निकाल आहे. या निकालात कोण बाजी मारणार त्यावरही जिल्हा परिषद, पंचायत समितीची गणिते अवलंबून आहेत. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.