कोल्हापूर : ‘FRP’चे १८६९ कोटी थकीत

राज्यातील चित्र ः ६५ साखर कारखान्यांकडून १०० टक्के ‘एफआरपी’; ‘बिद्री’च भारी
sugar cane
sugar cane sakal media

कोल्हापूर : यावर्षीच्या साखर हंगामात गाळप केलेल्या उसाच्या ‘एफआरपी’पोटी राज्यात तब्बल १८६९ कोटी थकीत आहेत. यावर्षी हंगाम घेतलेल्या १९९ कारखान्यांपैकी ६५ कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाची ‘एफआरपी’ अदा केली असून, ‘एफआरपी’ न दिलेल्या चार कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई केली आहे.

दरम्यान, यावर्षी सर्वाधिक दर दिलेल्या साखर कारखान्यात जिल्ह्यातील बिद्री कारखाना राज्यात भारी ठरला आहे. या कारखान्याने प्रतिटन ३१३३.४५ रुपये इतकी एफआरपी दिली. राज्यात सर्वाधिक एफआरपी दिलेल्या पहिल्या दहा कारखान्यांत ‘भोगावती-परिते’, पंचगंगा-रेणुका, कुंभी-कुडित्रे, डॉ. डी. वाय.- गगनबावडा व मंडलिक- हमीदवाडा या कारखान्यांचासमावेश आहे.

यावर्षीपासून एफआरपी देण्यासाठी उसाचा उतारा ज्या-त्या वर्षीचा ग्राह्य धरण्यात आला होता. साखरेचे वाढलेले उत्पादन आणि त्या तुलनेत कमी असलेली मागणी यामुळे साखरेचा उठाव प्रभावी झाला नाही. त्यात एकीकडे एफआरपीत वाढ केली जात असताना साखरेचा प्रतिक्विंटल दर मात्र ३१०० रुपयेच आहे, या दरात वाढ

करण्याची मागणी साखर उद्योगाची आहे. एकीकडे साखरेचे दर वाढत नाहीत आणि त्यामुळे एफआरपी देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी दोन टप्प्यात एफआरपी देण्यास सरकारने परवानगी दिली. त्याला शेतकरी संघटनांनी विरोध केला असला तरी कोल्हापूर, सांगली वगळता अन्य जिल्ह्यात दोन, तीन टप्प्यांतच एफआरपी देण्यात आली. तरीही राज्यात यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत एकूण एफआरपीपैकी ९५.२८ टक्के रक्कम आदा करण्यात आली आहे. अजूनही ४.७२ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

राज्यात सर्वाधिक दर दिलेले कारखाने (आकडे प्रतिटन रुपये)

बिद्री ः ३१३३.४५ राजारामबापू (युनिट ३) ३०४४.२३

भोगावती ः ३०४३.७३ पंचगंगा (रेणुका) ः ३०३८

सोनहिरा (सांगली) ः २९७७.६२ कुंभी ः २९७१.९८

राजारामबापू (युनिट २) ः २८८८.९७ रयत (कऱ्हाड) ः २८८२.२०

डॉ. डी. वाय. ः २८६५.८६ मंडलिक (हमीदवाडा) ः २८६४.१९

दृष्टिक्षेपात यावर्षीचा हंगाम

हंगाम घेतलेले कारखाने ................................१९९

एकूण ऊस गाळप १३०२.७२ लाख टन

एफआरपीप्रमाणे देय रक्कम ३९ हजार ५८२ कोटी

यापैकी दिलेली रक्कम ३७ हजार ७१२ कोटी

थकीत एफआरपीची रक्कम ....१ हजार ८६९ कोटी

१०० टक्के एफआरपी दिलेले कारखाने ..................................६५

८० ते ९९ टक्के रक्कम दिलेले कारखाने ...............................१०३

६० ते ७९ टक्के रक्कम दिलेले कारखाने .................................२६

६० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिलेले कारखाने..........................५हंगाम घेतलेले कारखाने ................................१९९

एकूण ऊस गाळप १३०२.७२ लाख टन

एफआरपीप्रमाणे देय रक्कम ३९ हजार ५८२ कोटी

यापैकी दिलेली रक्कम ३७ हजार ७१२ कोटी

थकीत एफआरपीची रक्कम ....१ हजार ८६९ कोटी

१०० टक्के एफआरपी दिलेले कारखाने ..................................६५

८० ते ९९ टक्के रक्कम दिलेले कारखाने ...............................१०३

६० ते ७९ टक्के रक्कम दिलेले कारखाने .................................२६

६० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिलेले कारखाने..........................५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com