

कोल्हापुरात ऊसदर आंदोलनाची धग वाढली...
esakal
Kolhapur Sugarcane Price Agitation : गत हंगामातील उसाचा हिशेब न देणे व चालू हंगामातील दर जाहीर न करता कारखाना सुरू केल्याच्या निषेधार्थ जय शिवराय किसान संघटनेने वारणेची ऊस वाहतूक वाठार (ता. हातकणंगले) येथे रोखली. दरम्यान, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिरोळ व कुरुंदवाड बंदला ग्रामस्थांनी कडकडीत प्रतिसाद दिला.