Kolhapur Accident: वाढदिनीच ओढावला मृत्यू! उसााच्या ट्रॉलीखाली चिरडून ६१ वर्षीय वृद्धाने गमावला जीव
Two wheeler - sugarcane tactor accident: वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा संकल्प ठेवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा काळाच्या झटक्यात मृत्यू.
कोल्हापूर: जिल्ह्यात रेंदाळ व शिरोळमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दोघेजण ठार झाले. रेंदाळमधील घटनेत वृद्धाचा तर शिरोळ येथील घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.