Video: फिरत्या चाकावर मातीला आकार देणारे हात आता इलेक्‍ट्रिकल यंत्रावर; शंभर कुटुंबांच्या हाताला गती

Sugdi for Makar Sankranti made Use of technology
Sugdi for Makar Sankranti made Use of technology
Updated on

कोल्हापूर : मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर फिरत्या चाकावर मातीला आकार देणारे हात आता इलेक्‍ट्रिकल यंत्रावरही तितक्‍याच सफाईदारपणे फिरू लागले आहेत. खुपिरे (ता. करवीर) येथील सुमारे शंभरभर कुटुंबांचे हात सध्या सुगडी तयार करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, जुन्या पद्धतीने चाक फिरवण्याऐवजी इलेक्‍ट्रॉनिक यंत्रामुळे विशिष्ट वयानंतर येणारा कंबरदुखीचा त्रास कमी झाला. 


जरी सुलभता आली असली तरीही मातीला दैवत्व देणाऱ्या कुंभार समाजाच्या कौशल्याला अजूनही तोड नाही, असेच चित्र येथे आहे. दरम्यान, खुपिरेत तयार होणाऱ्या बुंडुकल्यांना राज्यभरातून मागणी वाढली आहे.


सण कोणताही असो, जुनी परंपरा सांभाळताना नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत कुंभार समाजाचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे. गावातील कुंभार समाज या कामांत व्यस्त असला तरी खुपिरेतील समाजाने हा व्यवसाय विस्तारला आहे. येथील समाजाच्या नव्या पिढीतील मुलीही घर व शिक्षण सांभाळत मातीकाम करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. 


माझे शिक्षण नाही; परंतु मी फौंड्रीत नोकरीला असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, हे माहीत असल्याने त्याचा विचार करून नवीन मशिन बनविली. त्यामुळे कमी कष्टात जास्त उत्पादन तयार होऊ लागले.
- जयसिंग कुंभार, खुपिरे.

खुपिरे येथील बुंडूकली चांगल्या प्रतीची, मुबलक आणि योग्य भावात मिळतात. त्यामुळे आम्ही दहा ते पंधरा वर्षे खुपिरे येथूनच ती नेतो आणि ग्राहकांसाठी उपलब्ध करतो. 
- सुभाष कुंभार, येडेनिपाणी, सांगली.

जुन्या पद्धतीच्या मातीच्या चाकावरील मातीकाम वाकून करावे लागायचे; पण आता यंत्रामुळे पाठीचा व कंबरदुखीचा त्रास कमी झाला आहे.  
- दौलू कुंभार, खुपिरे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kagal Peth Naka Highway latest update
Devendra Fadnavis latest statement on ethanol petrol
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Marathi News Esakal
www.esakal.com