Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गणित बदलणार, सर्वोच्च न्यायालयाने चक्राकार पद्धतीसाठीची याचिका फेटाळली

Political News Kolhapur : नव्या नियमानुसारच गट, गणांवरील आरक्षण सोडत काढण्याचा मार्ग आज मोकळा झाला. दरम्यान, गट-गणांच्या आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी (ता.१३) होत आहे.
Kolhapur Zilla Parishad

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गणित बदलणार

esakal

Updated on
Summary

ठळक मुद्द्यांचा सारांश :

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समिती गणांवरील आरक्षण चक्राकार पद्धतीने करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, आता राज्य शासनाच्या नव्या नियमानुसारच आरक्षण सोडत होणार आहे.

१९९६ पासून सुरू असलेली चक्राकार आरक्षण प्रणाली पाच निवडणुकांपर्यंत (१९९७-२०१७) पूर्ण झाली असल्याने, ही आगामी निवडणूक ‘पहिली निवडणूक’ समजून शून्य आरक्षण नियम लागू करण्यात आला आहे.

या निकालामुळे सोमवारी (ता. १३) होणाऱ्या गट आणि गणांच्या आरक्षण सोडतीसाठी कायदेशीर अडथळे दूर झाले असून, जिल्हा निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणार आहे.

Kolhapur Poltical News : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांवरील आरक्षण प्रक्रियेत बदल करून १९९६ प्रमाणे चक्राकार पद्धतीने आरक्षण पद्धत राबवण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या निर्णयाने राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या नव्या नियमानुसारच गट, गणांवरील आरक्षण सोडत काढण्याचा मार्ग आज मोकळा झाला. दरम्यान, गट-गणांच्या आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी (ता.१३) होत आहे. गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर गणांची त्या त्या तहसीलदारांनी ठरविलेल्या ठिकाणी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com