MP Supriya Sule : अंबाबाईच्या दारातून सुप्रिया सुळेंनी पुकारला एल्गार; सरसकट कर्जमाफीसाठी रस्त्यावरची लढाई, लाडक्या बहिणींवर काय म्हणाल्या...

Ambabai Temple Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
MP Supriya Sule

MP Supriya Sule

esakal

Updated on
Summary

सुप्रिया सुळे यांचा कोल्हापूर दौरा

खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधून राज्य सरकारवर तीव्र टीका केली.

शेतकरी प्रश्नांवर संताप

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करणे, सरसकट कर्जमाफी देणे या मागण्यांकडे सरकारने अजूनही ठोस पावले उचललेली नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इशारा व टीका

हमीभाव, कर्जमाफीची दिलेली आश्वासने अपूर्ण; ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांची नावे वगळली; वेळेवर दखल घेतली नाही, तर रस्त्यावर उतरून लढाई लढू, असा इशारा.

Supriya Sule in Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुळेंनी संताप व्यक्त केला.

"राज्यात सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून आम्ही राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफीची मागणी करत आहोत. मात्र सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत," असे सुळे म्हणाल्या.

"संसदेच्या अधिवेशनात ही मागणी मांडण्यात आली होती. गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे देशाच्या दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आहे. राज्यावर संकट आल्यानंतर मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाहावं लागतं. म्हणूनच आम्ही अमित शाह यांच्याकडे विनंती केली होती की त्यांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यास सांगावे."

सुळे यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं, "हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील आहे. मागच्यावर्षी कोल्हापुरात याच सरकारने हमीभाव आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण त्याची अंमलबजावणी अजूनही नाही. 'लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. अन्नधान्य पिकवणारा शेतकरी आज संकटात आहे."

शेवटी, सुळे यांनी इशारा दिला की, "सरकारने जर वेळेवर दखल घेतली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून लढाई लढू."

प्रश्न उत्तर

१. सुप्रिया सुळे कोठे आल्या होत्या?

कोल्हापूरला, श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी.

२. त्यांनी कोणत्या मुद्द्यावर टीका केली?

शेतकऱ्यांच्या नुकसानावर, ‘ओला दुष्काळ’ जाहीर न होणे, सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी न होणे, ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांची नावे वगळणे.

३. केंद्र सरकारकडे कोणती मागणी केली होती?

अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यास सांगावे, अशी विनंती.

४. त्यांनी सरकारला कोणता इशारा दिला?

वेळेवर दखल घेतली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

५. मागच्यावर्षी सरकारने कोणती आश्वासने दिली होती?

हमीभाव व कर्जमाफीची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com