

Hasan Mushrif Zilla Parishad
esakal
Kolhapur Zilla Parishad member disqualification ruling : (संतोष माळी) : कसबा सांगाव येथील सुवर्णा रणजीत कांबळे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. त्यांचा ‘महार-अनुसूचित जाती’चे प्रमाणपत्र अवैध ठरविणारा पडताळणी समितीचा आदेश रद्द करून त्यांना दोन आठवड्यांत जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व अपात्र ठरविणारा पुणे विभागीय आयुक्तांचा आदेशही रद्द झाला आहे. न्यायमूर्ती शर्मिला यू. देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज पी. धोटे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.