esakal | स्वरूप उन्हाळकर अधिक जिद्दीने पुढच्या ऑलिम्पिकमध्ये यश संपादन करेल- पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

swaroop unhalkar

स्वरूप अधिक जिद्दीने पुढच्या ऑलिम्पिकमध्ये यश संपादन करेल- पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: पदकापासून एक पाऊल दूर रहावे लागल्याचे दुःख असले तरीही अधिक जिद्दीने तो पुढच्या ऑलिम्पिकमध्ये यश संपादन करेल भविष्यात तो अनेक आंतरराष्ट्रीय, पॅरॉलंपिक स्पर्धामध्ये भारताचं नाव निश्चितच उंचावेल आणि त्यासाठी लागेल ती मदत देण्याच आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.

हेही वाचा: एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन

ते कोल्हापूर डीस्ट्रीक्ट पॅरॉलंपिक, रायफल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरूप उन्हाळकर यांच्या स्वागत व सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. पॅरालम्पिक स्पर्धेतील सहभागानंतर स्वरूपचे आज कोल्हापूरमध्ये स्वागत करण्यात आले. टोकियो येथे पार पडलेल्या पॅरालम्पिक स्पर्धेत स्वरूप उन्हाळकर याने अनेक आव्हानांवर मात करत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने १० मीटर एअर रायफल प्रकारात प्रतिस्पर्ध्यांना कडवे आव्हान दिले मात्र पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.

स्वरूपचे आज कोल्हापूरमध्ये आगमन झाले. यानिमित्तान आमदार चंद्रकांत पाटील, कोल्हापूर डीस्ट्रीक्ट पॅरॉलंपिक असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा मेन अँड वुमेन्स रायफल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वागत व सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वरूप उन्हाळकर याचा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन कोल्हापूर वासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. टोकियो स्पर्धेला जाण्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सर्वच खेळाडूंशी संवाद साधला होता.

हेही वाचा: एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन

त्यामुळ त्यांना स्पर्धेसाठी बळ मिळालं होतं. पॅरालिंपिक स्पर्धेत स्वरूपला यशान हुलकावणी दिली असली तरी भविष्यात त्याला आंतरराष्ट्रीय आणि पॅरालिंपिक स्पर्धसाठी लागेल ते सहकार्य करण्याच आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. सत्काराला उत्तर देताना स्वरूपने ऑलम्पिक पर्यंतचा प्रवास आणि प्रसंग सांगितले. या स्पर्धेत पदकाने हुलकावणी दिली असली तरीही पुढील ऑलम्पिक मध्ये यश संपादनाचा विश्वास या मुळे निर्माण झाला असल्याचे सांगितले.

यावेळी सविता उन्हाळकर, अर्चना पांढरे, रंजना शेटे, प्रफुल्ल उन्हाळकर, प्रशांत उन्हाळकर, अनिल पोवार, कमलाकर कराळे, रमेश कूसाळे, दिलीप कांबळे, संजय पाटील, किशोर देशपांडे, अरुण पाटील, भाजपाचे महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सचिन चव्हाण यांच्यासह खेळाडू व मान्यवर उपस्थित होते.

loading image
go to top