पोहणं पडलं महागात, पाण्यात बुडून एकाचा मृत्यू तर एक जण बेपत्ता

देवरुख जवळील घटना; एकाचा मृत्यू तर एक बेपत्ता
पोहणं पडलं महागात, पाण्यात बुडून एकाचा मृत्यू तर एक जण बेपत्ता
sakal

संगमेश्वर: नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाला तर यातील एक तरुण तरुण बेपत्ता असून १५ वर्षीय युवकाला वाचविण्यातव ग्रामस्थांना यश आले आहे. अशोक झेपले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संजय सिताराम घाटकर हे बेपत्ता आहेत. ही घटना देवरुख नजीकच्या पूर झेपलेवाडी येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोहणं पडलं महागात, पाण्यात बुडून एकाचा मृत्यू तर एक जण बेपत्ता
पुणे : शोभेची दारू बनविणाऱ्या कंपनीला आग; एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू

गणेशोत्सवात मजा लुटण्यासाठी पूर झेपलेवाडी येथील काही चाकरमानी गावाकडे आले आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काही चाकरमानी व गावातील स्थानिक तरुण असे सुमारे दहा जण मिळून सप्तलिंगी नदीपात्रातील जांभळीचे उतरण या ठिकाणी पोहोण्यासाठी गेले होते. हे ठिकाण वस्तीपासून ३ मिनिटाच्या अंतरावर आहे.

गेली चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सप्तलिंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. १० तरुणांपैकी तिघांनी नदीपात्रात झेप घेतली. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब नदीकिनारी असणाऱ्या तरुणांच्या लक्षात येताच बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

यातील अशोक सोनू झेपले व हर्ष संजय घाटकर यांना वाचवण्यात यश आले आहे. हा प्रकार ग्रामस्थांना समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अशोक झेपले व हर्षद घाटकर यांना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी केल्यानंतर अशोक झेपले यांना मृत घोषित करण्यात आले.

हर्ष घाटकर याच्यावर उपचार सुरू आहेत. अशोक झेपले यांना मृत घोषित करताच पत्नी व मुलीने रुग्णालयात फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात अशोक झेपले यांच्या शवाचे विच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक

बाळकृष्ण जाधव यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष सरडकर, किशोर जोयशी,जावेद तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. पोहण्यासाठी गेलेल्यांपैकी संजय सिताराम घाटकर हे बेपत्ता झाले असून, ग्रामस्थ त्यांचा शोध घेत आहेत. शोध मोहिमेत ग्रामस्थांना बरोबरच देवरुख येथील राजूचकाकडे हेल्प अॅकॅडमीचे कार्यकर्ते व देवरुख घोरपीवाडीतील पोहण्यात तरबेज तरुण सहभागी झाले होते. येथील संपूर्ण नदी परिसर पिंजून काढण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com