Sakal Impact : अमली नशा रोखण्यासाठी धडक कारवाई करा; पोलिस अधीक्षक बलकवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Impact : अमली नशा रोखण्यासाठी धडक कारवाई करा; पोलिस अधीक्षक बलकवडे
Sakal Impact : अमली नशा रोखण्यासाठी धडक कारवाई करा; पोलिस अधीक्षक बलकवडे

Sakal Impact : अमली नशा रोखण्यासाठी धडक कारवाई करा; पोलिस अधीक्षक बलकवडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील नशा होणाऱ्या ठिकाणी धडक कारवाई करण्याच्या सूचना सर्वच पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनानाला पोलिसांचे सहकार्य आवश्‍यक आहे, त्या ठिकाणीही ते दिले जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. शहरासह जिल्ह्यात अमली पदार्थांची नशा रोखण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न झाले पाहिजेत, ही भूमिका घेऊन ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकला. पानपट्टी असोसिएशनने बर्न पेपर, कोन विक्री न करण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर यांनीही शाळा-महाविद्यालयातून जनजागृती केली जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सर्वच पोलिस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. याच पद्धतीने इतर विभागांनीही कारवाई सुरू केली. मुंबईतील ड्रग्जच्या कारवाईत आर्यन खानचे नाव पुढे आले. त्याला अटक केली. अलीकडेच चंदगड तालुक्यात ड्रग्जचा कारखाना उद्‌ध्वस्त केला. त्यानंतर जिल्ह्यातील अमली नशा आणि त्यासाठी असणाऱ्या यंत्रणेबाबत ‘सकाळ’ने मालिकेतून पर्दाफाश केला. याबाबत श्री.बलकवडे म्हणाले, की जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध व्यवसायांवर कारवाई केली जाते. ‘सकाळ''च्या मालिकेनंतर सर्वच पोलिसांना त्यांच्या हद्दीत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

मुख्याध्यापकांनाही अधिकार

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याची (COTPA, २००३) अंमलबजावणी शहरासह जिल्ह्यात झाली पाहिजे. यात पोलिस, मुख्याध्यापक यांना कारवाईचे अधिकार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सांकडून ही कारवाई केली जाऊ शकते. साधारण २० हून अधिक विभागांतील अधिकाऱ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि जाहिरातीबाबत कारवाईचे अधिकार दिले आहेत. त्याचा वापर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन केला तर शाळा-महाविद्यालयेच काय, परिसरही नशामुक्त होईल.

"जिल्ह्यातील १०० टक्के शाळा-महाविद्यालयांचा परिसर नशामुक्त होण्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांना सूचना दिल्या जातील. नशेपासून विद्यार्थी-पालक दूर राहतील, यासाठी प्रयत्न केले जातील. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांद्वारे शाळा- महाविद्यालयांचा परिसर नशामुक्त होण्यासाठी मोहीम राबविली जाईल."

- एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

"विद्यार्थी, मुले नशेच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आले. शाळा परिसर, रिकाम्या ठिकाणी नशा होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. शैक्षणिक परिसरात धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. या आशयाचे पत्र जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक शाळांना दिले जाईल."

- दत्तात्रय नाळे, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे

loading image
go to top