Kolhapur ACB Trap : चहाला नेत वारसा नोंदीसाठी तलाठी, कोतवालने १० हजार मागितले अन्, कोल्हापूरच्या लाचलुचपत विभागाने चांगली अद्दल घडवली

Bribe Case Kolhapur : वारसा नोंद घेण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी आणि कोतवाल यांना कोल्हापूर लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं. विभागाने रचलेल्या कारवाईत दोघांची चांगली अद्दल घडली.
Kolhapur ACB Trap

वारसा नोंद घेण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी आणि कोतवाल यांना कोल्हापूर लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं.

esakal

Updated on

Kolhapur Ichalkaranji Bribe Case : शहापूर येथील तलाठी व कोतवाल आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात पकडले गेले. वारसा नोंद करण्यासाठी गट खुला करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई झाली. तलाठी गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२, रा. मगदूम कॉलनी, जयसिंगपूर), कोतवाल नेताजी केशव पाटील (४५, रा. म्हसोबा रोड, दर्गा गल्ली, शहापूर) अशी दोघांची नावे आहेत. स्टेशन रोडवरील महापालिका परिसरात सापळा रचून ही कारवाई केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक, कोल्हापूर विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com