
राजेंद्र पाटील
कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांनी सोयीच्या बदलीसाठी खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित केले जाणार आहे. शिक्षक बदली प्रक्रिया सुरू असतानाच ग्रामविकास विभागाने आज जिल्हा परिषदांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहेत.