Teachers will have to attend school from today in karnataka
Teachers will have to attend school from today in karnataka

शिक्षकांना आजपासून शाळेत हजर राहावे लागणार

Published on

बेळगाव : शिक्षण खात्याने सोमवारपासून सर्व शिक्षकांना शाळेत हजर राहणे बंधणकारक असल्याचे कळविले आहे. त्यानुसार शिक्षकांना शाळेत हजर रहावे लागणार आहे. मात्र अनेक भागातील बस सेवा अद्याप सुरु न झाल्याने शिक्षकांना शाळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. 


शिक्षण खात्याने शाळा सुरु करण्याबाबत पूर्व तयारी करण्यासाठी शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारपासून मुख्याध्यापक शाळेत हजर झाले आहेत. तर सोमवारपासून सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरु होण्यास अजून वेळ असल्याने आतापासूनच शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्याने शिक्षकांमधून तिव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. शिक्षण खात्याने एक जुलैपासून टप्पाटप्पाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाळा सुरु करण्या अगोदर पालकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. यासाठी 10, 11 व 12 तारखेला शाळांमध्ये पालक व शाळा सुधारणा कमिटीची बैठक बोलविण्याची सूचना केली आहे. 

पालक व शाळा सुधारणा कमिटीच्या बैठकीत मांडण्यात आलेली मते मुख्याध्यापकांना ऑनलाईनव्दारे शिक्षण खात्याला कळवावी लागणार आहेत. त्यानंतर शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये मोठ्‌या प्रमाणात शिथिलता करण्यात आली असली तरी अजूनही काही भागातील बस सेवा सुरळीत नाही. त्यामुळे शिक्षकांना शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 


बस सेवा उपलब्ध करुन द्यावी

ग्रामीण भागासह अनेक भागात अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत त्यामुळे विविध मार्गावर बस सेवा उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे परिवहन मंडळाकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. मात्र ज्या भागात अद्याप बसेस सुरु आहेत त्या ठिकाणी बस सोडण्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांना खाजगी वाहनांची सोय करुन घ्यावी लागणार आहे. 

शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सर्व शाळांमध्ये पालक व शाळा सुधारणा कमिटीची बैठक, बोलाविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याबाबतची तयारी शिक्षकांना करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत हजर होण्याची सूचना करण्यात आली आहे. 

-ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com