
Nandani Math Bhattarak : नांदणी येथील हत्तीणी 'महादेवी' (माधुरी) ला अंबानी यांच्या ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावर नांदणी मठाचे पूज्य भट्टारक जिनसेन महास्वामीजी यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आणि उपस्थित श्रावक, श्राविकांनाही अश्रू अनावर झाले.