
Emotional Scene Jain Math : नांदणी येथील लोकांच्या भावना गुंतलेल्या ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीणला अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यावर आज अखेरचा निरोप घेण्याचा क्षण गावावर ओढवला. या भावनिक प्रसंगी नांदणी मठाचे भट्टारक जिनसेन महास्वामीजी यांनी स्वतः हत्तीणीला हार अर्पण केला. हार घालतानाच त्यांना अश्रू रोखता आले नाहीत तर हे दृश्य पाहून महादेवी हत्तीणीच्याही डोळ्यांतून अश्रू आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होते आहे.