दख्खनचा राजा जोतिबा देवाची 'या' महिन्यात चैत्र यात्रा; तहसीलदारांनी शासकीय यंत्रणेचा घेतला आढावा

पोलिस उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी यात्रेत ठेवण्यात येणाऱ्या बंदोबस्ताचे शिस्तबद्ध पद्धतीचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.
Jyotiba Temple
Jyotiba Templeesakal
Summary

जोतिबावरील अतिक्रमणे काढली जावीत तसेच मंदिरातील दर्शनरांगा, पोलिस बंदोबस्त, घाट रस्ते, वाहनतळ या विषयांवर चर्चा झाली.

जोतिबा डोंगर : एप्रिलमध्ये होणारी चैत्र यात्रा (Jyotiba Chaitra Yatra) पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्‍वाचे आहे, असे पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव (Tehsildar Madhavi Shinde Jadhav) यांनी स्पष्ट केले. येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने शासकीय यंत्रणेची पहिली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी जोतिबाच्या सरपंच सौ. राधा बुणे (Sarpanch Radha Bune) होत्या. जोतिबावरील अतिक्रमणे काढली जावीत तसेच मंदिरातील दर्शनरांगा, पोलिस बंदोबस्त, घाट रस्ते, वाहनतळ या विषयांवर चर्चा झाली.

Jyotiba Temple
वाढीव उसाच्या एफआरपीचे कारखान्यांसमोर आव्हान; साखरेचे दर पाच वर्षांपासून स्थिर, 5 वर्षांत 750 रुपयांची झाली वाढ

पोलिस उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी यात्रेत ठेवण्यात येणाऱ्या बंदोबस्ताचे शिस्तबद्ध पद्धतीचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. देवस्थानचे अधीक्षक धैर्यशील तिवले, कोडोली पोलिस (Kodoli Police) ठाण्याचे पोलिस अधिकारी नामदेव दांडगे, मनोज कदम, ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com