Kolhapur Tilari Ghat : तिलारी घाट दरीत कोसळला टेम्पो; शंभर फूट खोलवर वाहनाचे झाले तुकडे

Kolhapur Goa Road : शशीकुमार टेम्पो घेऊन कर्नाटक ते गोवा अशी वाहतूक करीत होता. सकाळी कर्नाटकहून तिलारी मार्गे गोव्याच्या दिशेने जात होते; मात्र नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
Kolhapur Tilari Ghat
Kolhapur Tilari Ghatesakal
Updated on

Tilari Ghat Kolhapur : माल वाहतूक करणारा टेम्पो तिलारी घाटातील जयकर पॉईंट तेथून थेट शंभर फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यात चालक शशीकुमार पी. (वय ४०, रा. शिमोगा, भद्रावती) व वाहक विजय गुप्ते (३८, रा. चिक्कोडी, कर्नाटक) गंभीर जखमी झाले. दोघांनाही बेळगाव केएलई रुग्णालयात दाखल केले. अपघातात टेम्पोचे चार तुकडे झाले. हा अपघात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com