
Ichalkaranji Attack
esakal
दुचाकीला आग लावली – साक्षीदार झाल्याच्या रागातून स्वराज कॉलनी, संगमनगर (ता. तारदाळ) येथे १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी पेटविण्यात आली.
धमक्या व नुकसान – ‘साक्ष देऊ नकोस’ असे धमकावून आरोपींनी पेट्रोल टाकून दुचाकीला आग लावली; सुमारे ₹१५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
गुन्हा दाखल व अटक – तात्यासाहेब शिवलिंग खिलारे यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; गंगा प्रवीण पाटील व अब्दुलकय्युम नौशाद तांबोळी या दोघांना पोलिसांनी अटक केली.
Crime In Ichalkaranji : साक्षीदार झाल्याच्या रागातून दोघा जणांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरासमोर त्याची दुचाकी पेटवली. ही घटना शुक्रवारी (ता. १९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्वराज कॉलनी, संगमनगर, तारदाळ येथे घडली. तात्यासाहेब शिवलिंग खिलारे यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, गंगा प्रवीण पाटील (रा. ड्रीम रिसॉर्टजवळ, संगमनगर) आणि अब्दुलकय्युम नौशाद तांबोळी (रा. गल्ली क्र. १०, स्वराज कॉलनी, संगमनगर) अशी त्यांची नावे आहेत.