

विवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी मुलीच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करीत घातपाताची शक्यता वर्तविली.
esakal
Kolhapur Crime News : टीईटी परीक्षेच्या अभ्यासातील तणावातून येथील आदर्श नगरातील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२०) रात्री घडली. कौसर इंजमामउलहक गरगरे (वय २७, रा. आर्दशनगर, कुरुंदवाड) असे या विवाहितेचे नाव आहे. या घटनेनंतर विवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी मुलीच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करीत घातपाताची शक्यता वर्तविली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला व मोठा तणाव निर्माण झाला. पती इंजमामउलहक राजमहंमद गरगरे (वय ३१) यांनी याबाबतची वर्दी कुरुंदवाड पोलिसांत दिली.