

90 lakh fraud
sakal
इचलकरंजी : कापड खरेदीच्या व्यवहारातून विश्वास संपादन करून तब्बल ९० लाख ७८ हजार ९५७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी मुख्य संशयित महेंद्रकुमार जसवंतराज सोलंकी ऊर्फ महेश जैन (वय ५२, रा. अंधेरी, मुंबई) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दुसरा संशयित अजयकुमार रस्तोगी (रा. दहिसर, मुंबई) अद्याप पसार आहे.