Kolhapur Election : जागावाटपावरून कोंडी; ठाकरे गटाचा मोठा निर्णय, इचलकरंजीत स्वबळावर रणशिंग फुंकले
Thackeray Group to Contest : जागावाटपावर सहमती न झाल्याने ठाकरे गटाचा निर्णायक निर्णय; इचलकरंजीत स्वबळावर लढत. ‘मशाल’ चिन्हावर २५ ते ३० उमेदवार उभे करण्याची तयारी; कार्यकर्त्यांना संधी
इचलकरंजी : शिव-शाहू विकास आघाडीने सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्ष स्वबळावर इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. याबाबतची घोषणा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.