पलूस शहरावर असणार आता 'सीसीटीव्ही'ची नजर

प्रमुख सहा ठिकाणी होणार उभारणी, २० लाख ५७५ हजाराचा निधी मंजूर
CCTV
CCTVsakal

पलूस: पलूस शहरात प्रमुख सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचे काम सुरू असून सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष पलूस पोलिस ठाण्यात असेल. त्यामुळे आता पलूस शहर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असणार आहे, अशी माहिती पलूस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

CCTV
बेळगाव: गणपतीचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

पलूस शहराची लोकसंख्या २५ ते ३० हजाराच्या घरात आहे. पलूस शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. नगरपालिका आहे. विविध शासकीय कामे, खरेदी व इतर कामांसाठी तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील लोक पलूस शहरात येत असतात. पलूसचे प्रमुख चौक, मार्ग नेहमीच माणसांच्या गर्दीने गजबजलेले असतात. मंगळवार आणि शनिवार असे दोन दिवस तर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

प्रमुख चौक, बाजारपेठ व मार्गावरील गर्दीचा गैरफायदा घेऊन किंवा रात्रीच्या वेळी बाजरपेठेत चोरी व इतर गुन्हे वारंवार घडत असतात. त्यामुळे पलूस शहरात प्रमुख चौक व मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी पोलिसांसह व्यापारी, नागरिक करित होते. यासाठी सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत होता. मंत्री डॉ. कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पलूस शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या खर्चासाठी २० लाख ५७५ हजाराचा निधी मंजूर केला.

सध्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. पलूस शहरातील मुख्य धोंडीराज महाराज चौक, शिवाजी पुतळा, चिंचेची शाळा, कुंडल वेस (मारुती चौक), सांडगेवाडी फाटा व पलूस कॉलनी फाटा अशा सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी व गुन्हेगार शोधण्यासाठी मदत होईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com